|
|
सोलापूर शहराविषयी: |
|
सोलापूर शहर भारत देशात महाराष्ट्र राज्यामधे आहे. आजला केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवडणेत आलेल्या १०० शहरांमधे सोलापूर शहराचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा अहमदनगर,उस्मानाबाद,सांगली,सातारा,पुणे या जिल्ह्यांना जोडलेला आहे. सोलापूर शहराची ओळख जगाच्या पटलावर “सोलापूरी चादरी” च्या रुपाने झालेली आहे. सोलापूर शहराचे वैशिष्ट्य म्हणजे या शहरात उत्तम शाळा , महाविद्यालये , इंजिनियरींग कॉलेजेस , मेडिकल कॉलेजेस तसेच इतरही विविध शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. सोलापूर वस्त्रोद्योगासाठी प्रसिध्द आहे. इतर औद्योगिक व्यवसायही भरभराटीस येत आहेत. उत्तम हॉस्पिटल्सची देखील सुविधा आहे. बस , रेल्वे , विमान इ. विविध दळणवळणाची साधने देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे मालवाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होते. प्रसिध्द तीर्थक्षेत्रे पंढरपूर , तुळजापूर , अक्कलकोट , गाणगापूर ही सोलापूरच्या जवळच असल्याने येथे भेट देण्यासाठी सोलापूरातूनच जावे लागते.सोलापूर येथील सिध्देश्वर मंदिर प्रसिध्द असून ते पंजाब मधील सुवर्ण मंदिराच्या प्रतिकृतीसारखे आहे. |