चीनी जनतेचे डॉ. कोटणीसांवरील प्रेम:

 
डॉ.द्वारकानाथ शांताराम कोटणीस सोबत वैद्यकीय सदस्‍य त्‍यांचे समवेत सरोजीनी नायडू
 
चीनला वैद्यकीय मदत करणेसाठी गेलेले पथक डॉ. सरोजिनी नायडू यांचेसमवेत
 
चीनला वैद्यकीय मदत करणेसाठी गेलेले पथक
 
प्रत्यक्ष युध्दभूमीवर वैद्यकीय साहित्यासहित डॉ. कोटणीस
 
प्रत्यक्ष युध्दभूमीवर डॉ. कोटणीस
 
-
 
-
 
-
 
-
 
शि चा च्वांग या हेबइ प्रांताच्या डॉ.द्वारकानाथ कोटणीस स्मृती हॉल मधील त्यांचे शिल्प
 
शि चा च्वांग या हेबइ प्रांताच्या डॉ.द्वारकानाथ कोटणीस स्मृती हॉल मधील त्यांचे शिल्प
 
शि चा च्वांग या हेबइ प्रांताच्या डॉ.द्वारकानाथ कोटणीस स्मृती हॉल मधील त्यांचे शिल्प
 
शि चा च्वांग या हेबइ प्रांताच्या डॉ.द्वारकानाथ कोटणीस स्मृती हॉल मधील त्यांचे शिल्प

सन 1949 साली चीन स्‍वतंत्र झाला. 1974 व 1975 नंतर आपल्‍याला स्‍वातंत्र लढ्यामध्‍ये ज्‍या विदेशी मित्रांनी मदत केली त्‍या सर्वांची स्‍मृती जतन करायला चिनी राज्‍यकर्त्‍यांनी सुरुवात केली. आपल्या काळया आईला डॉ.कोटणीसांना तर चिनी जनता विसरणे शक्‍यच नव्‍हती. आंतरराष्‍ट्रीय मानवतावादाची जपणूक करण्‍यासाठी चीनी जनतेसाठी अतिशय खडतर व प्रतीकूल परिस्थितीमध्‍ये अहोरात्र सेवा करत असतानाच आपले प्राण गमवावे लागणा-या डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांची स्‍मृती सतत जागृत ठेवण्‍यासाठी , त्‍यांचा आदर्श तरुणांसमोर रहावा म्‍हणून चिनी सत्‍ताधा-यांनी डॉ.कोटणीसांच्‍या केलेल्‍या कार्याबद्दल कृतज्ञता व्‍यक्‍त केली. डॉ.कोटणीस यांनी चीनमध्‍ये केलेल्‍या त्‍यांच्या कार्याचा गौरव म्‍हणून त्‍यांना “पिवळया मातीतील काळी आई” अशी आईची पदवी त्‍यांना देण्‍यात आली.

1974 साली चीन सरकारने डॉ. कोटणीस यांच्या भगिनी श्रीमती मनोरमा कोटणीस यांना सन्मानाने चीन भेटीचे आमंत्रण दिले. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे तिसरे उपाध्यक्ष येह चिन यीन यांनी बिजींग येथे त्यांचे स्वागत केले व त्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केले. डॉ. कोटणीसांनी ज्या परिसरात प्रत्यक्ष युध्दभूमीवर जाऊन चिनी सैनिकांवर वेद्यकीय उपचार केले त्या परिसरात ( शि चा च्वांग या हेबइ प्रांताच्या शहरामध्ये ) “डॉ. बेथ्यून आंतरराष्ट्रीय शांतता हॉस्पिटल ” आहे. याच हॉस्पिटलच्या प्रशस्त आवारामध्ये “ डॉ.द्वारकानाथ कोटणीस स्‍मृती हॉल ” चे उद्घाटन दि. 9 डिसेंबर 1976 रोजी म्‍हणजेच डॉ.कोटणीसांच्‍या स्‍मृतीदिनी भव्‍य दिमाखात करण्‍यात आले.या सभारंभासाठी डॉ.कोटणीसांच्‍या कुटुंबीयांना सन्‍मानाने आमंत्रित करण्‍यात आले होते. या भव्य हॉलमधे डॉ. कोटणीसांचे वैद्यकीय सेवा देत असतानाचे त्यावेळेचे मोठे केलेले फोटोग्राफस् , त्यांच्यावर आधारित काही पेंटींग्ज , सुंदर शिल्पे आणि डॉ. कोटणीसांच्या वापरातील वस्तू आकर्षकपणे ठेवण्यात आल्या आहेत.

चीन सरकारने डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे छायाचित्र असलेले खास टपाल तिकीटे काढली. त्‍याचप्रमाणे पोस्‍टाची त्‍यांचे चित्र असलेली प्रथमदिन पाकीटेही काढण्‍यात आली. शिवाय शालेय अभ्‍यासक्रमातील पुस्‍तकांमध्‍ये डॉ. कोटणीस यांच्‍या कार्याची माहिती देणारे धडे समाविष्‍ट करण्‍यात आले.

भारतीय वैद्यकीय पथक चीनमध्‍ये गेले, त्‍यास 50 वर्षे पूर्ण झाल्‍यानिमित्‍त 1988 साली शि चा च्‍वांग येथे ‘इंडियन एड मिशन हॉल’ या हॉलमध्ये वैद्यकीय पथकाच्या कार्याची संपूर्ण माहिती देणा-या कायमस्वरुपी प्रदर्शनाचे उद् घाटन झाले. या खास समारंभास श्रीमती मनोरमा कोटणीस यांना आंमत्रित करण्यात आले होते. हेबेइ प्रांतातील तानशिएन कौंटी या शहरामध्ये 1995 साली ‘डॉ. कोटणीस मेडीकल स्कूल’ या नावाने वैद्यकीय शिक्षण संस्था सुरु करण्यात आली. हेबेइ प्रांतातील वैद्यकीय विद्यापीठाच्या शि च्या च्वांग येथील दोन क्रमांकाच्या हॉस्पिटलचे नामकरण 1996 साली ‘डॉ. कोटणीस भारत-चीन मैत्री हॉस्पिटल’ असे करण्यात आले. 1998 साली याच हॉस्पिटलच्या आवारामध्ये डॉ. कोटणीसांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला.

चीनमधील रेडियो, दूरदर्शन व वृत्तपत्रे आदी प्रसारमाध्यमांमधून भारतीय वैद्यकीय पथक व डॉ. कोटणीस यांच्‍या कार्याबद्दल अनेक कार्यक्रम सातत्‍याने सादर करण्‍यात येतात. डॉ. कोटणीसांबद्दलच्‍या पुस्तिका, सचित्र माहिती पत्रके, डॉ. कोटणीसांची प्रतिमा असलेले छोटे बिल्‍ले, त्‍यांच्‍या छायाचित्रांच्‍या तसविरी, त्‍यांची प्रतिमा कोरलेल्‍या लहान सिरॅमिक प्‍लेटस्, कोटणीसांचे धातूचे अर्धपुतळे इ. मोठ्या प्रमाणात चीनमध्‍ये प्रसारित करण्‍यात आले आहेत. डॉ. कोटणीसांची स्‍मृती कृतज्ञतापूर्वक जतन करण्‍यासाठी हरत-हेचे प्रयत्‍न केले जातात.

सन २००९ मधे चीनचा 60 वा स्वातंत्र्यदिन भव्‍य प्रमाणात साजरा करण्‍याचे सरकारने ठरविले. संपुर्ण चीनमध्‍ये मोठमोठे कार्यक्रम झाले. परंतू यानिमित्‍त चीनी आंतरराष्‍ट्रीय रेडीयो, चीनची आंतरराष्‍ट्रीय मित्रता संघटना व चीनी सरकारी विदेशी विशेषज्ञ ब्‍युरो यांनी संयुक्‍तपणे चीनी जनतेला “चीनचे सर्वोत्‍तम आंतरराष्‍ट्रीय मित्र ” कोण , ते निवडण्‍यासाठी इंटरनेट वर आपली मते पाठविण्‍याचे आवाहन केले. चीन देशाला व चिनी नागरीकांना गेल्‍या 100 वर्षाच्‍या कालावधीमध्‍ये युध्‍द, नैसर्गिक आपत्‍ती व इतर संकटामध्‍ये ज्‍या परदेशी मित्रांनी मदत केली, तसेच चीनच्‍या विकासामध्‍ये ज्‍यांनी हातभार लावला अशा काही परदेशी व्‍यक्‍तींची नावे सुचविण्‍यात आली व त्‍यातून 10 जणांची ‘सर्वोत्‍तम आंतरराष्‍ट्रीय मित्र ’ अशी निवड करण्‍यात येणार होती. या निवड प्रक्रियेला उस्‍फुर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 5 कोटी 60 लाख लोकांनी आपली मते नोंदवली. पहिली 10 नावे ‘सर्वोत्‍तम आंतराष्‍ट्रीय मित्र’ म्‍हणून घोषित करण्‍यात आली. त्‍यामध्‍ये डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा समावेश होता हे मोठ्या अभिमानाने नमूद करावेसे वाटते.

दि. 8 डिसेंबर 2009 रोजी बिजींग येथील ‘ग्रेट हॉल ऑफ पीपल’ या प्रख्‍यात आणि अतिभव्‍य सभागृहात एक दिमाखदार असा गौरव समारंभ आयोजित करण्‍यात आला होता. या समारंभासाठी कोटणीस कुटुंबियांना खास आमंत्रित करण्‍यात आले होते. या समारंभामध्‍ये ‘सर्वोत्‍तम आंतरराष्‍ट्रीय मित्र ’ म्‍हणून निवड झालेल्‍या 10 व्‍यक्‍तींचा एक सुशोभित पदक व धातूंच्‍या नक्षीदार तबकावर कोरलेले गौरवपत्र प्रदान करुन त्‍यांचा सम्‍मान करण्‍यात आला.