डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांचे चीनमधील कार्य:

 
डॉ.द्वारकानाथ शांताराम कोटणीस सोबत वैद्यकीय सदस्‍य त्‍यांचे समवेत सरोजीनी नायडू
 
डॉ.द्वारकानाथ शांताराम कोटणीस चीन वैद्यकीयसाठी मिटींग करताना
 
डॉ.द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांचे सोबतचे वैद्यकीय सदस्य
 
डॉ.द्वारकानाथ शांताराम कोटणीस चीन दौरा
 
डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांनी पाण्‍याची तपासणी करताना
 
डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांनी चीनच्या भारतीय संशोधनाचे स्वागत केले आहे
 
डॉ.द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांचे सोबत सुभाषचंद्र भोस आणि वैद्यकीय सदस्‍य
 
-
 
डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस सैन्य वर्दीमध्ये

दुस-या महायुध्‍दाच्‍या काळात सन 1937 मध्‍ये जपानने चीनवर आक्रमण केले होते. त्‍यावेळी दुस-या महायुध्‍दात चीन खूपच मागासलेला होता. दुस-या महायुध्‍दामध्‍ये त्‍यावेळेस तज्ञ डॉक्‍टर , वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्‍यामुळे तेथे हजारो चिनी सैनिक मरत होते व काही कायमचे अपंग बनत होते. चिनी जनता देशाचे रक्षण करण्यासाठी एकदिलानं जपानशी प्राणपणाने लढत होती.

एका जर्मन वर्तमानपत्राच्‍या अमेरिकेत जन्‍मलेल्‍या पण चीनमध्‍ये राहणा-या अॅग्‍नेस स्मडेल या युध्‍दवार्ताहर स्‍त्रीने चीनच्‍या आठव्‍या पलटणीचे प्रमुख सेनानी जनरल च्‍युतेह यांच्‍या मुख्‍य छावणीतून पंडित नेहरुंना 23 नोव्‍हेंबर 1937 रोजी पत्र पाठविले. या पत्रात त्‍यांनी कपडे, पादत्राणे व अन्‍न यांच्‍या अभावी लढा देणा-या चिनी स्‍वयंसेवकांचे कसे हाल होत आहेत हे लिहिले होते. च्‍युतेह यांनी देखील स्‍वतः वेगळं पत्र 26 नोव्‍हेंबर 1937 रोजी पंडित नेहरुंना पाठवलं. त्‍यात त्‍यांनी शस्त्रक्रियेची उपकरणं,औषधे,शिक्षित डॉक्‍टर्स व परिचारिका पाठवाव्‍या म्‍हणून विनंती केली होती. याला प्रतिसाद म्‍हणून वैद्यकीय सामुग्री व शस्‍त्रक्रियेच्‍या उपकरणांसहित वैद्यकीय पथक पाठवण्‍याचं ठरवलं गेलं.

भारताचे सहा डॉक्टरांचे एक पथक नेमण्‍यात आले.त्‍यामध्‍ये 1.डॉ.मोहनलाल अटल (अलाहाबाद ) 2.डॉ.एस.एस.चोलकर (नागपूर ) 3.डॉ.विजयकुमार बसु (कोलकत्‍ता) 4.डॉ.देवेंद्र मुखर्जी (कोलकत्‍ता )5. डॉ.नितीन (नागपूर) 6.डॉ.द्वारकानाथ कोटणीस (सोलापूर) यांचा समावेश होता . दि. 1 सप्‍टेंबर 1934 रोजी या पथकाला मुंबईहून बोटीने पाठविण्‍यात आले.त्‍यावेळेस श्रीमती सरोजिनी नायडू यांनी या पथकाला निरोप दिला. भारतीय पथकाने प्रत्यक्ष युध्दभूमीवर जाऊन प्रतिकूल हवामानात औषधे व साधन सामुग्रीची कमतरता असताना देखील अथक परिश्रम करुन अनेकांचे प्राण वाचवले. अनेकांना अपंग होण्यापासून वाचविले. सैनिकांबरोबरच खेड्यापाड्यातील जनतेवर त्यांनी उपचार केले. कामाचा कालावधी संपल्यावर डॉ. अटल , डॉ. चोलकर , डॉ. मुखर्जी हे भारतात परतले परंतु चीनमधे वैद्यकीय सेवांची खरी गरज आहे हे लक्षात घेऊन डॉ. बसु , डॉ. कोटणीस हे चीनमध्येच सेवा करीत राहिले. डॉ. कोटणीस हे चिनी जनतेशी समरस झाले . ते चिनी भाषासुध्दा शिकले.

चिनी लष्‍करप्रमुख च्‍यू तेह यांनी कॅनेडियन डॉक्‍टर नॉर्मन बेथ्‍यून यांनी चीनमध्‍ये केलेल्‍या आदर्श रुग्णसेवेची माहिती डॉ. कोटणीसांनी सांगितली.तेंव्‍हापासून डॉ.बेथ्‍यून यांचा आदर्श सेवाभाव मनात जोपासत डॉ. कोटणीसांनी कोकुंग यंथील आतंरराष्‍ट्रीय शांतता इस्पितळाचा कार्यभार स्वीकारला.त्‍या इस्पितळाचे पहिले डायरेक्‍टर म्‍हणून त्‍यांची नियुक्‍ती करण्‍यात आली. अत्‍यंत वात्‍सल्‍याने दिवसरात्र आपले कर्तव्‍य बजावीत त्‍यांनी रुग्णसेवा केली.रुग्‍णांची सेवा करताना त्‍यांनी आपली आत्‍मशक्‍ती पणाला लावली. त्‍यामुळे चिनी नागरिकांना ते आपल्‍या लाडक्‍या मातेसमान निकटचे वाटू लागले.ते सावळ्या वर्णाचे असल्‍याने त्‍यांना 'काळी आई ' हे आदराचे बहुमानाचे टोपणनाव ही बहाल झाले होते.

त्‍यांनी दि.25 नोव्हेंबर 1941 रोजी चिनी परिचारिका को चिंग लान यांच्‍याशी विवाह केला. 23 ऑगस्‍ट 1942 ला को चिंग लानने मुलाला जन्‍म दिला. या मुलाचं नाव इंगव्‍हा (इंग म्‍हणजे भारत व व्‍हा म्‍हणजे फूल किंवा चीन अर्थात भारताचं फूल किंवा भारत व चीन ) असं ठेवण्‍यात आलं.

युध्‍द संपल्‍यानंतर इपिलेप्‍सी म्‍हणजे फीट्सच्‍या आजाराने त्‍यांना घेरले.दुर्दैवाने त्‍या काळात इपिलेप्‍सी या विकारावर उपचार नव्‍हते.आपल्‍या आजारासंबंधी कोणाशीही न बोलता व त्‍याकडे संपूर्ण दुर्लक्ष करुन कोटणीस रुग्‍णांसाठी कष्‍ट करत राहिले. आपल्‍या कामातून थोडी जरी उसंत मिळाली की ते चिनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी 'जनरल इन्‍ट्रोडक्‍शन टु सर्जरी ' , ' सर्जरी इन डिटेल ' ही पुस्‍तके इंग्रजी व चिनी भाषेतून लिहीत राहिले.

अखेर दि. ९ डिसेंबर १९४२ साली ज्या आंतरराष्ट्रीय शांतता इस्पितळाचे ते प्रमुख होते , ज्याच्या उभारणीसाठी त्यांनी अतोनात कष्ट केले होते त्याच इस्पितळात चीनमधे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी चीनमधे ठिकठिकाणी शोकसभा भरवण्यात आल्या व त्यात त्यांच्या बौध्दिक गुणांचं तसंच मनाच्या मोठेपणाचं अत्यंत सन्मानपूर्वक वर्णन करण्यात आलं. अठराव्या सैन्याच्या तुकडीने ( ज्याला पूर्वी “ आठवा मार्ग सैन्य म्हणत ) संपूर्ण लष्करी इतमामानं डॉ. कोटणीसांचं चीनमधील होपेमधील छांगशियान तालुक्यातील चून – चेंग विभागातील नान क्वान या खेडेगावात दफन केलं.