डॉ.द्वारकानाथ कोटणीसांचे शिक्षण:

डॉ.कोटणीस डेक्कन कॉलेज, पुणे येथे सैन्य प्रशिक्षण कॅडेटसमवेत डॉ. कोटणीस त्यांचे प्राध्यापक डॉ. एन.सी.शहा व डॉ. वॉटर्स यांचेसमवेत

डॉ.द्वारकानाथ यांचे शालेय शिक्षण सोलापूरच्‍या नॉर्थकोट हायस्‍कूल मध्‍ये झाले. त्‍यांनी मॅट्रीक झाल्‍यानंतर 1928 मध्‍ये पुण्‍याच्‍या डेक्‍कन कॉलेज मध्‍ये प्रवेश घेतला. कॉलेजमध्‍ये ते अभ्‍यासात हुशार असले तरी मजा करण्‍यामध्‍येही पुढे असत. त्‍यांना टेनिस खेळण्‍याची देखील आवड होती.

सन 1931 मध्‍ये इंटरसायन्‍सच्‍या परीक्षेत पास झाल्‍यानंतर त्‍यांनी मुंबईच्‍या गोवर्धन दास सुंदरलाल मेडिकल कॉलेजमध्‍ये प्रवेश मिळवला. डिसेंबर 1932 मध्‍ये त्‍यांनी MBBS ची पहिली प‍रीक्षा पास झाल्‍यानंतर मुंबईच्‍याच ग्रॅन्‍ट मेडिकल कॉलेज मध्‍ये ते दाखल झाले. सन 1936 मध्‍ये त्‍यांनी MBBS ची पदवी मिळवली.