डॉ.द्वारकानाथ कोटणीस यांच्‍या परिवाराबाबत:

 
डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांचे आई- वडिल
 
डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांचा परिवार
 
भावांसमवेत डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस
 
डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांच्या भगिनी मनोरमा कोटणीस
 
लक्ष्मी विष्णू मिल येथील घरे - डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीसांचे सोलापूरातील पहिले वास्तव्य
 
डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांची पत्नी व मुलगा त्यांच्या आई समवेत
 
डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस यांची पत्नी व मुलगा पंडित नेहरु व इंदिरा गांधी यांचेसमवेत

कोकणातील वेंगुर्ला हे डॉ.द्वारकानाथ यांचे मूळ गाव आहे मात्र कामानिमित्‍त त्‍यांचे वडील सोलापूरात आले. सर्वप्रथम लक्ष्‍मी मिलमध्‍ये ते कारकून म्‍हणून कामाला होते व स्‍वातंत्र्यचळवळीत देखील त्‍यांचा सहभाग होता.

सन 1920 मध्‍ये त्‍यांचे वडील स्‍थानिक म्‍युनिसिपालटीच्‍या निवडणुकीत निवडून आले. तेव्‍हापासून 1938 पर्यंत ते म्‍युनिसिपालटीचे सभासद होते. याकालावधीत त्‍यांनी आरोग्‍य , शिक्षण, रस्‍ते, पब्लिक वर्क्‍स, बागा आणि मार्केट, तांत्रिक शिक्षण अशा विविध समित्‍यांचे चेअरमन या नात्‍यानं नागरिकांची सेवा केली. त्‍यांनी प्रत्‍येक खात्‍यामध्‍ये दूरगामी सुधारणा घडवून आणण्‍याचा प्रयत्‍न केला.

कोटणीस कुंटुंबीय सुरुवातीला सोलापूरमधे लक्ष्‍मी मिलच्‍या कर्मचारी निवासात रहात होते. सन 1928 मध्‍ये डॉ.द्वारकानाथांच्‍या वडिलांनी आज स्‍मारकात रुपांतरित केलेली वास्‍तू खरेदी केली. डॉ. द्वारकानाथ यांच्‍यावर त्‍यांच्‍या आई वडिलांच्‍या सामाजिक कार्याचा प्रभाव दिसून येतो.